Quantcast
Channel: ORIENT PUBLICATION
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

‘शौर्य’ आणि ‘सेवेची’ अपूर्व भेट..

$
0
0



स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या चित्रीकरणस्थळी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांची सदिच्छा भेट.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आता एका नव्या वळणावर उभी आहे. या मालिकेत शिवपर्वाची अखेर होऊन शंभूयुगाची सुरुवात होत असताना,एक सुखद घटना या मालिकेच्या सेटवर घडली. आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी लोकसेवेकरता समर्पित केलं ते डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे या सेवाव्रती दांपत्याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेच्या सेटवर कलाकारांना सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. लोकबिरादरी प्रकल्पातील जुन्या आठवणींना उजाळा देत वन्यप्राणी आणि माणसांमध्ये जुळून आलेले भावबंध त्यांनी उलगडले. दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा आणि त्याची सेवा करा’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. स्वतःची ओंजळ भरल्यानंतरदुसऱ्याची ओंजळ भरण्यासाठी आपल्या ओंजळीतलं दुसऱ्याला देऊ करणारी ही दोन व्यक्तिमत्व या सेट वर आली आणि आम्हा कलाकारांशी संवाद साधलाआजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय आहे’ असं म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी दोघांचे आभार मानले.

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचा भव्य सेट पाहून साक्षात शिवकाळात गेल्यासारखं वाटलं’ अशा भावना मंदाताईंनी व्यक्त केल्या तर ही मालिका संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणत आहे’ असं म्हणत डॉ. प्रकाश आमटे यांनी कलाकार आणि तंत्रज्ञांची पाठ थोपटली. या मौल्यवान आशीर्वादांनी मालिकेतले सगळे कलाकार भारावून गेले होते.

Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles