Quantcast
Channel: ORIENT PUBLICATION
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

‘आसूड’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

$
0
0


अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी पेटवत शेतकऱ्यांच्या हितासाठी एका युवकाचा व्यवस्थेविरोधातला धडाकेबाज लढा दाखवणाऱ्या‘आसूड’  चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अॅक्शन आणि इमोशनचा तडका असलेल्या या ट्रेलरला सोशल माध्यमावर प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. ‘आसूड हा राजकीय महापट ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत आसूड चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांचे आहे.
विक्रम गोखलेप्रदीप वेलणकरमाधव अभ्यंकरअनंत जोगदीपक शिर्केउपेंद्र दातेसंदेश जाधवकमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूरअवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही नवी आघाडीची जोडी या चित्रपटात झळकणार आहेत.
या चित्रपटाची सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथापटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles