Quantcast
Channel: ORIENT PUBLICATION
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

‘लालबत्ती’ २६ जुलैला चित्रपटगृहात

$
0
0

पोलिसांची लाचखोरीअधिकाराचा उन्मादगुन्हेगारांशी असणारे साटेलोटे याच्या बातम्या आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतात. त्यामुळे पोलिस आणि जनता यांच्यामधील विश्वासाची जागा संशयाने आणि टीकेने घेतली आहेपण पोलिसांचे शौर्य, वीरता आणि त्यांच्यातील माणुसकी ह्याचा उल्लेख मात्र कमी प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सतत झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीमम’ध्ये (क्यूआरटी) घडलेल्या एकासत्यघटनेवर आधारित असलेला लालबत्ती’ हा मराठी चित्रपट २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साई सिनेमा’ या चित्रपट निर्मिती संस्थेची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले असून निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भविष्यात दहशतवादी हल्ले रोखायचेत्यांना सडेतोड उत्तर द्यायचेतर तसे प्रशिक्षित कमांडो दल असणे आवश्यक होते व याच गरजेतून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने पोलिसांच्या सबलीकरणासाठी क्विक रिस्पॉन्स टीमची (क्यूआरटी) स्थापनामहाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी केली. दहशतवाद विरोधी  मोहिमांमध्ये चिघळलेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी स्थापन केलेल्या क्यूआरटी च्या कमांडोची ट्रेनिंग अतिशय कठीण असते. याच खडतर ट्रेनिंगचा थरार दाखवत आणि दहशतवादाशी मुकाबला करत, ज्येष्ठ पोलिस अधिकारी एस.बी.पवार आणि त्यांच्या हाताखाली क्विक रिस्पॉन्स टीममध्ये असणारा कमांडो गणेश, यांच्या नातेसंबधाभोवती लालबत्ती चित्रपटाची कथा फिरते.
लालबत्ती या चित्रपटात मंगेश देसाईभार्गवी चिरमुलेतेजसरमेश वाणीमीरा जोशीअनिल गवसमनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला अविनाश-विश्वजीत यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांचे असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
 लालबत्ती’ २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles