Quantcast
Channel: ORIENT PUBLICATION
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

पूरग्रस्तांसाठी मुंबईच्या डबेवाल्यांचा मदतीचा हात

$
0
0


महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था-संघटना पुढे सरसावल्या असताना आता मुंबईच्या डबेवाल्यांनी ‘नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स’ चॅरिटी ट्रस्ट व ‘मॅक्सविंग्स मिडिया’च्या माध्यमातून मुंबई रेल्वे स्थानकांवर तसेच स्थानकालगतच्या परिसरात जनतेस मदतीसाठी आवाहन केले आहे.

आपल्या रोजच्या सेवेतून वेळ काढून मुंबईच्या डबेवाल्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चर्चगेटलोअर परेलदादरवांद्रे, अंधेरी या रेल्वे स्थानकांवर तसेच आजूबाजूच्या परिसरात जनतेकडून निधी गोळा करण्यासाठी उपक्रम राबविला. दरम्यान जनतेने मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला. या मदतीसाठी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष श्री.उल्हास मुके आणि मॅक्सविंग्सच्या संचालिका रुणाली पाटील व श्री. बाबुराव भोर यांनी मुंबईकरांचे आभार मानले.

येत्या शनिवारी १७ ऑगस्ट रोजी डबेवाले संस्थेचे पदाधिकारी पूरग्रस्त भागात स्वतः जाऊन मिळालेल्या निधीचे व ग्राहकांकडून मिळालेल्या वस्तूंचे वाटप त्या ठिकाणी करणार आहेत. जर आपणास मदत करायची इच्छा असेल तर ७०२१४२५९४९ या क्रमांक वर संपर्क साधण्याची विनंती संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles