Quantcast
Channel: ORIENT PUBLICATION
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हलालला उदंड प्रतिसाद

$
0
0


देश-विदेशातल्या चित्रपट महोत्सवात नावाजला गेलेला हलाल चित्रपट गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्येही चांगलाच गाजला. प्रेक्षकांच्या उंदड प्रतिसादात रंगलेल्याहलाल चित्रपटाने गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्येही आपला ठसा उमटवला. गोमांतकीय रसिकांनी हलालला दिलेली पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया निर्माते अमोल कागणे यांनी व्यक्त केली.

रूढी परंपरांच्या जोखाड्यात अडकलेल्या मानवी वेदनेच्या कथेला दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी रुपेरी पडद्यावर साकारत मानवी मूल्यांचा व जगण्याचा वेध परखडपणे घेतला आहे. राजन खान यांच्या कथेवर बेतलेलाहलाल चित्रपट मुस्लिम समाजातील रितीरिवाज व विवाहसंस्थेवर भाष्य करतो.

 अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत हलाल सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर,प्रितम कागणेप्रियदर्शन जाधवविजय चव्हाणछाया कदमअमोल कागणे,विमल म्हात्रेसंजय सुगावकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. निर्माते अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेतछायांकन रमणीरंजनदास याचं असून संकलन निलेश गावंड याचं आहे. संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली असून आदर्श शिंदे व विजय गटलेवार यांचे सूर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत.

सामाजिक भान जागृत करणारी हलाल ही कलाकृती मराठी सिनेसृष्टीला नवे आयाम देणारी असेल हे निश्चित.

Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles