Quantcast
Channel: ORIENT PUBLICATION
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

शुभं करोति कल्याणम् मधून नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला

$
0
0


सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांसोबत नवनवीन चेहरे ही रुपेरी पडद्यावर झळकताना दिसत असतात. तेजल भालेराव हा असाच एक नवा चेहरा लवकरच ‘शुभं करोति कल्याणम्’ या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून बालमजूरी सारखा महत्त्वाचा विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. विश्वकर्मा चित्रची प्रस्तुती असलेल्या ‘शुभं करोति कल्याणम्’ची निर्मिती दिपा भालेराव यांनी केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेन्द्रसिंह राजपूत यांनी केले आहे. येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

तेजलचा हा पहिलाच सिनेमा असला तरी तिने आपल्या अभिनयाने यातील भूमिका समर्थपणे साकारली आहे. अश्विनी एकबोटेसिया पाटीलनरेश बिडकर अशा अनुभवी कलाकारांसोबत तितक्याच तोडीचा अभिनय साकारण्याचे आव्हान तेजलने खुबीने पेलले आहे.

‘शुभं करोति कल्याणम्’ या चित्रपटातून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका मुलीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडते जी तिच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते. अशी कोणती घटना घडते?  चांगल्या-वाईटाची समज देत प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध लढायला शिकवणाऱ्या ‘शुभं करोति कल्याणम्’ चित्रपटातून सुरेख संदेश दिला आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles