चॅनलच्या विविध कार्यक्रमांमध्ये जाऊन प्रमोशन करण्याचा फंडा आता चांगलाच रुजलाय. १२ जूनला भेटीला येणाऱ्या मधु इथे अन चंद्र तिथे या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमने नांदा सौख्य भरेच्या सेटवर उपस्थिती लावत धमाल मस्तीत चित्रपटाचं प्रमोशन केलं. नांदा सौख्य भरेच्या सेटवर धमालमस्तीत रंगलेला हा भाग शुक्रवार १० जूनला पहाता येईल.
‘चित्रपंढरी’ या बॅनरखाली येणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते झी टॉकीज व रत्नकांत जगताप आहेत. दिग्दर्शक संजय झणकर मधु इथे अन चंद्र तिथे या चित्रपटातून एक रंजक कथा आपल्यासमोर उलगडणार आहेत. प्रत्येक शहराची स्वत:ची एक खासियत असते. हीच खासियत घेऊन कोल्हापूर व पुणे हे एकत्र आल्यावर उडणाऱ्या धमाल कथेची मेजवानी म्हणजे मधु इथे अन चंद्र तिथे हा सिनेमा.
झी टॉकीजवर रविवार १२ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं ६ वाजता हा चित्रपट पहाता येईल.