Quantcast
Channel: ORIENT PUBLICATION
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

‘फर्जंद’ चित्रपटाच्या टीमने साजरे केले यश

$
0
0

चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद

एखादी कलाकृती उत्तम असेल तर प्रेक्षक आणि प्रसार माध्यमांकडून तिचे दणक्यात स्वागत होतेच. चित्रपटाच्या  मुहूर्तापासून आपले वेगळेपण अधोरखित करणाऱ्या फर्जंद या मराठी चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. सर्वांच्या अपेक्षेवर खरं उतरतफर्जंद चित्रपटाची यशस्वी घौडदौड आजतागायत सुरु आहे. १ जूनला प्रदर्शित झालेल्या फर्जंद चित्रपटाने तीन आठवड्यात चांगला गल्ला जमवलाअसून आता चौथ्या आठवड्यातही राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळवतोय. चित्रपटाला मिळालेले हे घवघवीत यश साजरे करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच एकत्र जमली होती. या यशाला कृतज्ञतेची झालर ही होती.

चित्रपटाचे हे यश साजरे करत असताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने माध्यम प्रतिनिधींचा सत्कार याप्रसंगी केला. रसिकांनी हा चित्रपट उचलून धरल्याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त करतानाच, ‘चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे समाधान’ यावेळी व्यक्त केले.
कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या फर्जंद या चित्रपटातल्या कलाकारांच्या कामगिरीचेदेखील सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे. या चित्रपटाचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. फर्जंद सिनेमा चौथ्या आठवड्यातही महाराष्ट्राच्या अनेक चित्रपटगृहात आवडीने पाहिला जात आहे जय भवानीजय शिवाजीचा जयघोष करीत चित्रपटगृहे आजही फर्जंदमय झालेली पहायला मिळत आहेत. स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपीची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या फर्जंदचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केलं आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधवमहेश जाऊरकरस्वप्नील पोतदार आहेत.

Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles