Quantcast
Channel: ORIENT PUBLICATION
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

आक्रंदन चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित

$
0
0

अनेकदा समाजात स्त्रीला एक भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जातं. लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण आपल्या देशात दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.  या भयाण वास्तवाची जाणीव करून देतानाच आपल्या जबाबदारीची जाणीवही करून देणाऱ्या आक्रंदन या मराठी चित्रपटाची पहिली झलक  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या  हस्ते प्रकाशित करण्यात आली. दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अल हज हजरत झहीद हुसैन चिश्ती यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.  येत्या ७ सप्टेंबर ला आक्रंदन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
समाजातील संवेदनशील विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाला दाद देत या चित्रपटाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. विवेक पंडित प्रस्तुत व गोविंद आहेर निर्मित आक्रंदन’ चित्रपटामध्ये एका गरीब असाहाय्य हिलेवर झालेली अत्याचाराची घटनाया घटनेनंतर एकत्र येत समाजात न्यायासाठी झालेला उठाव या भोवती चित्रपटाचे कथासूत्र गुंफण्यात आले आहे .
उपेंद्र लिमयेशरद पोंक्षेमिलिंद इनामदारगणेश यादवबाळ धुरी यासोबत विक्रम गोखलेस्मिता तळवळकरअमिता खोपकरप्रदीप वेलणकर,उदय टिकेकरभारत गणेशपुरेतेजश्री प्रधानविलास उजवणेपल्लवी वाघस्नेहा बिरांजे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आक्रंदन मध्ये आहेत. चित्रपटाची कथादिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून पटकथा- संवाद शशिकांत देशपांडे व मिलिंद इनामदार यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर दामोदर नायडू यांनी केलंय. संकलन मनोज सांकला यांचं आहे.
‘पेन अँड कॅमेरा इंटरनॅशनल’ हा चित्रपट प्रदर्शित करत आहे. ७ सप्टेंबर  ला आक्रंदन सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles